भिडे गुरुजींच्या स्वप्नातील किल्ले रायगड.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या स्वप्नातील किल्ले रायगड.
गुरुजी एकदा बोलले होते,"हा रायगड आमच्या ताब्यात द्या.!
आम्हाला त्याला असे नटवायचे आहे ,असे सजवायचे आहे कि हिरोजी इंदुलकरांच्या आत्म्यास हेवा वाटावा,आनंदाश्रू यावेत त्यांच्या नयनात...!!
३२ मण सोन्याचे सिंहासन आम्ही पुन्हा निर्माण करणार आहोत, महाराष्ट्रातील ३६५ तालुके दररोज १ तालुका याप्रमाणे हातात शस्त्र घेवून त्याच्या संरक्षणाची जबाबदारी घेतील.
होय,आम्हाला नको आहेत भाडोत्री रक्षणकर्ते ..!
आमचे धारकरी करतील रक्षण.
सर्व जगाला हेवा वाटावा असे स्फूर्ती प्रेरणादायी वास्तू '' रायगड'' निर्माण करायचा आहे आम्हाला.
रायगड हा शब्द जरी उच्चारला काटा यावा असा स्फूर्तीचा झरा वस्तू निर्माण करू रायगडावर..!!
कारण,हा रायगड जर नसता तर हिंदूंचे १२ ज्योतिर्लिंग सुध्दा टिकले नसते,पंढरपूर तुळजापूर टिकली नसती ...!
कोणी जर विचारेल कि हिंदूंची ज्योतिर्लिंगे किती तर तर १२ नाही १४ सांगायची
१३ वे रायगड आणि १४ वे वढू बुद्रुक ...!
हि दोन नसती तर उरलेली १२ शिल्लकच राहिली नसती ...!"
- गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी
🚩 श्री शिवप्रतिष्ठान हिंन्दुस्थान🚩
गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजींशी.. त्रिवार अभिवादन..!!!
ReplyDeleteआपली धडपड पाहता हे स्वप्न नक्कीच सत्यात उतरेल..
जय भवानी.. जय शिवराय..!!!