अनेक गडकोट किल्ल्यांवर प्रेमी युगलांची नावे:शिवप्रेमी संतप्त
ज्या छत्रपती शिवरायांनी शेकडो किल्ले जिंकुन देखिल कधी स्वतःचे नाव गडावर लिहले नाही त्याच शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मात्र आजकाल प्रेमी युगलांनी नावे लिहुन अक्षरशः कहर केलेला आहे
आज आपण कोणत्याही किल्ल्यावर गेलं तरी तिथे आपणाला अशी नावे आढळून येतात
हा प्रकार अत्यंत संतापजनक असुन याप्रकारावर महाराष्ट्र शासन व पुरातत्त्व विभाग कमालीचे दुर्लक्ष करत आहे.
खेदाची बाब म्हणजे जे शिवप्रेमी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करतात त्यांच्यावरच उलट केस करण्यात येते.
ह्या प्रकारांवर शासनाने योग्य पावले उचलावीत अन्यथा शिवभक्त कायदा हातात घेण्याची शक्यता आहे.
Comments
Post a Comment