त्या वक्तव्यानंतर उदयनराजे समर्थकांकडुन शरद पवार ट्रोल
काल कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात आलेल्या शरद पवारांनी उदयनराजेंवर केलेल्या टीकेनंतर राजे समर्थकांकडुन शरद पवारांना ट्रोल करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी मध्ये अंतर्गत वाद वाढत असुन पक्षाच्या आमदारांचे राजेंसोबत पटत नाही याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर पवार म्हणाले अंतर्गत वाद वगैरे माझ्यापुढे बरोबर मिटतो व उडविलेली कॉलर निवडणुका लागल्यावर आपोआप खाली येते असा खोचक टोला त्यांनी उदयनराजेंना लगावला.
याचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटले.
राजे समर्थकांनी पवार व राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला.
पवार साहेब तुम्हाला राजेंची गरज आहे राजेंना तुमची नाही.
राजेंमुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीची कॉलर ताठ आहे.
तुम्ही फक्त राहुल गांधी वगैरेंवर टीका करा राजेंवर नाही
अशा प्रकारच्या टिप्पण्या राजे समर्थकांकडुन येत आहेत.
Comments
Post a Comment