फाटक्या हा शब्दप्रयोग संभाजी भिडेंसाठी नव्हे तर प्रकाश आंबेडकरांसाठीच
मराठा आरक्षणावरुन प्रकाश आंबेडकर यांनी नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राणेंचे पुत्र निलेश राणे चांगलेच आक्रमक झाले व त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर एकेरी टीका केली.
हा फाटक्या,संभाजी भिडेंना एक दिवससुद्धा जेलमध्ये पाठवु शकला नाही अशी टीका निलेश राणे यांनी केली होती,परंतु त्यांनी केलेला फाटक्या हा शब्दप्रयोग नेमका प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी होता की संभाजी भिडे यांच्यासाठी होता याबाबत नेटिझन्स संभ्रमात पडले, परंतु निलेश राणे यांनी केलेले ट्विट पडताळून पाहिले असता तो शब्दप्रयोग प्रकाश आंबेडकर यांच्यासाठीच असल्याचे स्पष्ट झाले.
Comments
Post a Comment