शिवाजी महाराजांची दुसरी राजमुद्रा तुम्हाला माहिती आहे का
।। प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।
शिवरायांची ही राजमुद्रा आपणा सर्वांना माहिती आहे.
पण राज्याभिषेक समयी महाराजांची आणखी एक राजमुद्रा होती,ती कोणती व तिचा अर्थ काय हे जाणुन घेऊयात.
‘शिवछत्रपतींची मुद्रा अष्टभूजा असलेली आहे.
‘श्री महादेव श्री तुळजाभवानी II शिवनृपरूपेणोर्वीमवतीर्णोय: स्वयं प्रभु र्विष्णू:II
एषा तदीय मुद्रा भूबळयस्याभयप्रदा जयतीII’
असा संस्कृत श्लोक कोरलेला आहे.
या श्लोकाचा मराठी अनुवाद
‘श्री शिवरायांच्या रुपामध्ये पृथ्वीवरती अवतीर्ण झालेले हे स्वत: श्री विष्णूच होत.
त्यांची ही मुद्रा संपूर्ण भूतलाला अभय देणार आहे.
तिचा जयजयकार असो,’
असा होतो.
Comments
Post a Comment