कर्मवीरांना भारतरत्न द्या : जयंत पाटलांचे मोदींना पत्र.

"कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न प्रदान करण्यात यावा"
- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मागणी
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घेतलेली परिश्रमांमुळेच आज बहुजन समाजाच्या अनेक पिढया ज्ञानाच्या प्रकाशात न्हाऊन निघाल्या.कर्मवीरांचे हे काम भारतरत्न च्या तोडीचे निश्चित आहे, असे मत व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात यावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडे पत्राद्वारे केली. संपूर्ण महाराष्ट्राला कर्मवीर अण्णांच्या कामाविषयी नितांत कृतज्ञता आहे. मात्र, महाराष्ट्रातून पहिल्यांदाच कोणीतरी कर्मवीर अण्णांना भारतरत्न ची मागणी करून कर्मवीर अण्णांच्या खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातून यापूर्वी कोणीही अण्णांना भारतरत्न देण्यात यावा, हि मागणी केली नव्हती. जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहून राज्य सरकारने केंद्राकडे कर्मवीर अण्णांच्या भारतरत्न साठी शिफारस करावी, अशी विनंती केली आहे.
रयत शिक्षण संस्थेवर आणि कर्मवीर अण्णांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी जयंत पाटील यांच्या मागणीबद्दल अत्यंत समाधान आणि आनंद व्यक्त केला. 'जयंत पाटील यांनी केलेली ही मागणी पूर्ण होणे हिच अण्णांसाठी खरी आदरांजली असणार आहे' असे मत रयत शिक्षण संस्थेतील एका प्राध्यापकांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवदान

संभाजी भिडेंचा तो फोटो पाहुन नेटकरी हळहळले

गडकोट मोहिम प्रचारासाठी भिडे गुरुजींच्या बैठकांचा धडाका