छत्रपती उदयनराजे भोसले व भिडे गुरुजी - एक अतुट ऋणानुबंध
छत्रपती शिवरायांचे १३ वे वंशज व साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यातील ऋणानुबंध आपणाला वेळोवेळी पहायला मिळतो.
शिवप्रतिष्ठानच्या अनेक कार्यक्रमांना उदयनराजे भोसले यांना निमंत्रण असते अनेक वेळेस ते आवर्जुन उपस्थित राहतात,तसेच शिवप्रतिष्ठानच्या गडकोट मोहीमेसाठी येणाऱ्या हजारो वाहनांचा टोल माफ होतो तो उदयनराजेंमुळेच.
दुसरीकडे प्रतिवर्षी साताऱ्यात पार पडणाऱ्या विजयादशमी दसऱ्याच्या सीमोल्लंघन सोहळ्याला प्रतिवर्षी भिडे गुरुजींना निमंत्रण असते व ते देखिल न चुकता या शाही सोहळ्याला उपस्थित राहतात.
उदयनराजे व भिडे गुरुजी यांनी अनेक प्रकरणात एकमेकांची खंबीरपणे पाठराखण केलेली आहे.
सांगली येथील शिवसन्मान जागर परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भिडे गुरुजी हे मिरज दंगलीचे मास्टरमाइंड आहेत असा आरोप केलेला,त्यावेळी उदयनराजे चांगलेच संतापले होते.
भिडे गुरुजींबद्दल असे आरोप खपवुन घेणार नाही संबंधितांना आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ असा सज्जड दम त्यांनी आव्हाडांना दिलेला.
त्यानंतर जुलै २०१७ मध्ये उदयनराजेंवर खंडणी व मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला व न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारलेला, त्यामुळे राजेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
त्यावेळी भिडे गुरुजी यांनी राज्य सरकारला आक्रमक इशारा दिलेला.उदयनराजेंची अटक ही उभ्या महाराष्ट्राला चीड आणणारी गोष्ट आहे,उदयनराजेंना अटक झाल्यास आम्ही पेटुन उठू असा इशारा त्यांनी दिलेला.
तर नुकत्याच झालेल्या कोरेगाव भीमा प्रकरणात सर्व बाजुंनी भिडे गुरुजींवर आरोप होत असताना उदयनराजे मात्र गुरुजींची बाजु घेण्यासाठी पुढे सरसावले.
भिडे गुरुजी हे एक ग्रेट व्यक्तिमत्त्व, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची लायकी पण नाही अशा शब्दात त्यांनी आरोप करणाऱ्यांचे वाभाडे काढले होते.
अशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले व शिवाजी ह्या तीन शब्दांसाठी आयुष्य वेचणारे भिडे गुरुजी यांच्यात एक अतुट ऋणानुबंध असल्याचे पहावयास मिळते.
Comments
Post a Comment