साताऱ्यात उद्या उदयनराजे,भिडे गुरुजींसह दिग्गजांची मांदियाळी
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले कल्चरल फौंडेशन व पंकज चव्हाण डान्स अकॅडमी सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दिनांक २५ पासुन राजधानी महोत्सवाला सुरुवात होतेय.
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या किल्ले अजिंक्यतारा येथे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या शुभहस्ते या राजधानी महोत्सवाचा शुभारंभ होत आहे.
राजधानी महोत्सवासाठी उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिलेले आहे तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना देखिल निमंत्रण दिलेले आहे.
विशेष म्हणजे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर यांना देखिल निमंत्रित केले आहे.
उद्या अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवशाहीचे दर्शन घडविणारा शिवजागर कार्यक्रम होणार आहे. यामध्ये छत्रपती शिवरायांची जीवनगाथा, लाठीकाठी खेळ, शिवकालिन शस्त्र प्रदर्शन, दांडपट्टा असे मर्दानीखेळ युवक युवती दाखविणार आहेत.
सदर उद्धाटन सोहळ्याला खासदार उदयनराजे भोसले,संभाजीराव भिडे,राजमाता कल्पनाराजे भोसले, दमयंती राजे भोसले,नगराध्यक्षा माधवी कदम यांसह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
Comments
Post a Comment