जिवा महालांचे १३ व्वे वंशज जगतायत हलाखीचे जीवन
अफजलखान भेटीप्रसंगी शिवरायांचे प्राण वाचवणाऱ्या जिवा महालांचे १३ वे वंशज आज अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत
छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवणार्या जिवा महालाचे वंशज हालाखीच्या परिस्थितीत !
छत्रपतींच्या महाराष्ट्रात वीर मावळ्यांच्या वंशजांना अशा स्थितीला सामोरे जावे लागणे दुर्दैवी !
छत्रपती शिवाजी महाराज यांचा वीर मावळा जिवा महाला छत्रपती शिवरायांचा अंगरक्षक होता. प्रतापगडावर अफझलखानाशी महाराज लढा देत असतांना महाराजांवर वार करणाऱ्यां सय्यद बंडाचे हात त्यांनी छाटले होते. आपल्या चपळाईने महाला यांनी महाराजांचे प्राण वाचवले. त्यामुळे ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ ही म्हण प्रचलित झाली; परंतु सध्या या शूर मावळ्याचे वंशज हालाखीचे जीवन जगत आहेत. जिवा महालाच्या वंशजांना मोलमजुरी करून आपले पोट भरावे लागत आहे.
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात कृष्णानदीच्या तीरावर कोंढिवली हे ६३६ लोकसंख्या असलेले असलेले गाव आहे. या गावात वीर जिवा महालाचे १३ वे वंशज रहातात. प्रकाश बाळकृष्ण सपकाळ असे त्यांचे नाव असून ते पत्नी आणि २ मुले यांच्या समवेत झोपडीत रहातात.
Comments
Post a Comment