हार-तुरे थांबवा रे मला काम करु द्या -जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी आमदार जयंत पाटील यांची निवड होऊन एक आठवडा उलटुन गेला असला तरी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अजुनही रीघ सुरुच आहे.
जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघात असले की त्यांच्या कार्यालयात व निवासस्थानी जिल्ह्यातील जयंत प्रेमींची झुंबड उडत आहे.
आपला नेता प्रदेशाध्यक्ष झाला याचा आनंद त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गगनात मावेनासा झालाय.
परंतु शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये काही तरी काम घेऊन येणारे लोक पण असतात त्यामुळे त्यांच्यासाठी वेळ देता येत नाहीये,तसेच लग्नसराई असल्यामुळे दररोज 20-25 लग्न सोहळ्यात जयंत पाटील यांना हजेरी लावावी लागत आहे.
त्यामुळे आता हार तुरे थांबवा मला आता काम करुद्या अस प्रेमळ आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
Comments
Post a Comment