कडेगाव विधानसभा पोटनिवडणुक:विश्वजित कदम बिनविरोध
जेष्ठ नेते व माजी मंत्री डॉ पतंगराव कदम यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पलूस कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीत पतंगराव कदम यांचे सुपुत्र डॉ विश्वजित कदम हे अखेर बिनविरोध निवडुन आले.
आज अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी भाजपचे उमेदवार व जिल्हापरिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत सगळ्यांनाच धक्का दिला.
कोणतीही व्यक्ती निधन पावल्यास त्याजागी होणाऱ्या पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याची आपली संस्कृती असल्याचे महसुल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले.
Comments
Post a Comment