कोपर्डीची श्रद्धा अद्यापही न्यायाच्या प्रतिक्षेत
कोपर्डी येथे घडलेल्या घटनेला दीड वर्ष होऊन गेले तरी श्रद्धाला अद्याप न्याय मिळालेला नाहीये.
अत्यंत क्रुर पद्धतीने तिच्यावर अत्याचार करुन तिचा खुन करणाऱ्या नराधमांना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे पण त्याची अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न सर्व स्तरातून विचारला जात आहे.
कोपर्डीच्या ह्या ताईला न्याय मिळावा म्हणुन मराठा समाजाचे अतिविराट मोर्चे निघाले मात्र तरीही नराधमांना फाशी देण्यास विलंब होत आहे.
लवकरात लवकर त्या तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सकल मराठा समाजाकडून करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment