पतंगरावांच्या आठवणीने विश्वजित कदम गहिवरले
काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मंत्री डॉ.पतंगराव कदम यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत डॉ विश्वजित कदम बिनविरोध निवडुन आले.
विजयानंतर मात्र वडिलांच्या आठवणीने विश्वजित कदम यांना अश्रु अनावर झाले.
वडिलांनी दिलेला समाजसेवेचा वसा समर्थपणे शेवटपर्यंत पेलणार,पलूस कडेगाव ची जनता हे माझं कुटुंब आहे,त्यांच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध आहे या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन एकप्रकारे डॉ पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहिली.
Comments
Post a Comment