मला नको पण शिवेंद्रराजेंना तरी रयतचा संचालक करायला हवे होते - उदयनराजे भोसले
रयत संस्था वाढवण्यासाठी आमच्या आजीसाहेबांनी शेकडो एकर जमिनी दिल्या,पण रयत शिक्षण संस्थेत छत्रपती घराण्यातील एकही संचालक का नाही असा थेट सवाल उदयनराजे भोसले यांनी केलेला आहे.
ते म्हणाले,
रयत शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळावर साताऱ्यातील माजी सनदी अधिकारी देशमुख, दळवी तसेच आमदार शिंदे चालतात, चांगली गोष्ट आहे याबद्दल माझ काही म्हणन नाही....
पण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेला आमच्या आज्जीसाहेब छत्रपती सुमित्राराजे भोसले यांनी सातारा शहरामधे अनेक ठिकाणी व जिल्ह्यात विविध ठिकाणी मोफत शाळा व कॉलेज साठी जमीनी दिल्या मग छत्रपती घराण्यातील एकाही व्यक्तीला संस्थेच्या संचालक पदी काम करण्याची संधी का मिळाली नाही...
मला नको पण आमदार शिवेंद्रराजेंना तरी रयत चे संचालक करायला हवे होते...
कर्मवीर भाऊराव पाटील यांनीच ठरवले होते रयत च्या अध्यक्षपदाचा मान हा राज्याचे मुख्यमंत्री यांचा असेल पण आणांच्या नंतर काय काय चालू आहे सगळे बघत आहेत...
Comments
Post a Comment