अजित दादांच्या कर्तव्य तत्परतेमुळे त्याला मिळाले जीवनदान
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान आमदार अजित दादा पवार यांच्यातील माणुसकीचे दर्शन पुन्हा एकदा घडले.
काल रात्री 9 वाजता श्री संतोष बजरंग जाधव राहणार बिबवि हे महाबळेश्वर सातारा रस्त्याने स्वताच्या दुचाकीवरून जात असताना रानडुक्कराने अचानक धड़क दिल्याने रस्त्यावर निर्जन ठिकाणी अपघात होऊन मदतीच्या प्रतीक्षेत पडले होते.
त्याच रस्त्याने महाबळेश्वर वरुन एक विवाहसोहळा आटपूण जात असणाऱ्या अजित दादा पवार यांच्या लक्षात ही गोष्ट आली अजितदादानी तातडीने स्वतःची गाड़ी थांबवून बेशुद्ध जखमी अवस्थेत असलेल्या श्री जाधव याना आपले युवा कार्यकर्ते रविराज तावरे लाखे व स्वीय सहायक सुनील मुसळे यांच्या मदतीने उचलून स्वतःच्या गाडीमधून सातारा येथील क्रांतिसिह नाना पाटिल जिल्हा रुग्णालय येथे पोच करण्याची व्यवस्था केली व स्वतः फ़ोन वरून डॉक्टराना जखमीच्या तब्येती ची खबरदारी घेण्या बाबत सूचना दिल्या तसेच आपले कार्यकर्ते व स्वीय सहायक याना जखमी ला रुग्णालयात दाखल करून उपचार झाल्या खेरीज रुग्णालय न सोडण्याची आवर्जून सूचना करण्यास ही विसरले नाहीत.
Comments
Post a Comment