१४ मे पासुन साताऱ्यात पासपोर्ट सेवा:मान्यवरांच्या हस्ते होणार उद्घाटन
१४ मे पासुन सातारा शहरातच पासपोर्ट सेवा चालु होणार असुन सातारकरांना आता दुसरीकडे हेलपाटे मारावे लागणार नाहीयेत.
छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारने साताऱ्यात पासपोर्ट सेवा सुरु करण्याच्या मागणीला हिरवा कंदील दाखवला.
दरम्यान या उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे
निमंत्रण पत्रिकेमध्ये राज्यमंत्री सदाभाऊ खोत,विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर,पालकमंत्री विजय शिवतारे,यांसह जिल्ह्यातील सर्व आमदारांची नावे आहेत.
विशेष म्हणजे निमंत्रण पत्रिकेवर शिवेंद्रसिंहराजे यांचे देखिल नाव आहे.
Comments
Post a Comment