स्वराज्य रक्षक संभाजी मालिका - भाग क्रमांक १९७ चे विश्लेषण

शृंगारपूर ला जावे शुभा सांभाळावा हे फर्मानात वाचून शंभूराजे खूप चिडतात .स्वतः च्या मुलाला फर्मान का पाठवले याचा राग/संताप येतो .(शंकराचा तिसरा डोळा उघडल्यावर जसा प्रलय येतो तसा शंभूराजे च्या हाती फर्मान पडल्यावर शंभूराजा चे रौद्ररूप रायगडावर सर्वां ना दिसणार असे येसूबाई आणि मातोश्रींना वाटते )खाजगी मध्ये आबासाहेब आहोत आणि चारचौघात छत्रपती सारखे वागतात या गोष्टीचा शंभूराजे ना राग येतो .येसूबाई नी ठसा का लगेच दिलात शाहनिशा का केली नाही .मोतोश्री नी ठसा देताना का थांबवले नाही असा मोतोश्री ना विचारतात .
मामासाहेबा ना (पीलजीराव )शृंगारपूर ला जावून दिवाणजी कडून सरकारी निवास स्थान तयार ठेवण्यास सांगतात .फर्मान छत्रपती चे आहे त्याचा अवमान करता येणार नाही .त्या प्रमाणे वागावे लागेल (रागात हि समजूतदार पणा).येसूबाई ना निघण्याची तयारी करण्यास सांगतात .रागाने निघून जातात पुतळा मातोश्री येसूबाई ना शंभूराजे च्या मागे जाण्यास सांगतात .
पंत आणि पेशवे काहि माहित नसल्या सारखे दाखवतात आणि चिटणीस यांना फर्मान कोणाला होते त्यात काय लिहले होते ते विचारतात .चिटणीसा ना खूप वाईट वाटते आपण असे फर्मान लिहिले .शंभूराजे च्या फर्मान विषयी ते सदरेवर सांगतात .पंत पेशवे खूप खुश होतात पण चेहऱ्यावर खूप दुःख आहे असे दाखवतात .महाराजाच्या आदेशाचे पालन मावळे स्वराज्य हिता साठी कसे करतात हे सांगतात .चिटणीस गेल्यावर दोघे खूष होतात स्वतः ची मुत्सदेगिरी कामी आली /मना सारखे दान पडले म्हणून खूपच खुश असतात .पुतळा मातोश्री महाराजांकडे जातात फर्मान खूप छान लिहिले आहे म्हणतात आऊ साहेब असत्या तर त्यांनी सोन्याचे कडे दिले असते (असा टोला मरतात )अनेक प्रश्न विचारतात .छत्रपती कोणत्याहि प्रश्न ची उत्तरे देण्यास बांधील नाहीत असे महराज म्हणतात .
पंत शंभूराजे ना मुद्दाम थांबवतात आणि फर्माना बाबत विचारतात .महाराजाच्या निर्णया बद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात .पंत आणि पेशवे स्वतः ची खेळी महाराजाना कशी समजली नाही या मधे समाधानी असतात .
येसूबाई आपण कुठे कमी पडत नाही ना युवराजा ना सांभाळताना असे पुतळा मातोश्री ना विचारतात .

जोत्यजी युवराज कुठे दिसत नाहीत सांगतो .(गडावर बाकीचे लोक का दिसत नाहित)
जगदिश्वर मंदिरात घंटानाद ऐकु येतो म्हणून येसूबाई पुतळाबाई आश्चर्य चकित होतात .
शंभूराजे जगदिश्वर मंदिरात येतात (आऊ साहेबाच्या समाधि ठिकाणी जातील असे अपेक्षित होते )आणि बालपणापासून नियती कसे निष्ठूर डाव खेळते हे जगदिश्वरा ला सांगतात .आईचे दूध पिण्या आधी तिचा पान्हा अटावा रांगू लागलो चालू मातोश्री देवाघरी गेल्या .खेळण्याच्या वयात मुघलां कडे ओलीस राहिलो त्या नंतर आग्रा ची कैद /मथूरेचा एकटे पणा अनुभवला .नंतर आऊ साहेब सोडून गेल्या .चारित्र्या वर कलंक लावण्याचा प्रयत्न झाला .छत्रपती समोर आरोपी म्हणून उभे रहावे लगले .न्याय मिळाला पण बदनामी ने काळीज सोलवटून गेले .
ऎवढे सगळे होवून हि आपण समजूतदार पणे वागलो .म्हणून च आपल्या इच्छा आकांक्षा चा कडेलोट होतो .आपले च पंख छाटले जातात .जगदिश्वरा नाही सहन होत आता . (असेच काहीसे प्रेक्षकाच्या मनात पण आहे .)
एका हातात फर्मान आणि दुसऱ्या हाताने घंटानाद. मागे पंत आणि पेशवे खूप आनंदी उभे आहेत .

Comments

Popular posts from this blog

संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवदान

संभाजी भिडेंचा तो फोटो पाहुन नेटकरी हळहळले

गडकोट मोहिम प्रचारासाठी भिडे गुरुजींच्या बैठकांचा धडाका