सेनेने पडत्या काळात आधार दिला,उद्धव ठाकरेंसोबत माझे २५ वर्षांचे ऋणानुबंध - छगन भुजबळ
जेलमधुन बाहेर आल्यानंतर आज प्रथमच छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
परवाच छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली,त्याबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले शिवसेनेने मला पडत्या काळात आधार दिला.
मी जेलमध्ये असताना वृत्तपत्र वाचायचो सामना मधुन सहानभुती दाखवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पंकज भुजबळ मातोश्रीवर गेल्याचे त्यांनी सांगितले.
त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्याला काळजी घ्या असा आपुलकीचा सल्ला दिला कारण शिवसेनेसोबत,उद्धव ठाकरेंसोबत माझा २५ वर्षांपासून ऋणानुबंध आहे असही भुजबळ म्हणाले.
Comments
Post a Comment