स्वराज्य रक्षक संभाजी मालिका - भाग क्रमांक १९९
सोयराबाई बाळराजे ना कुठे होतात विचारतात
बाळराजे सदरेवर शंभूराजे ची वाट पाहत असल्याचे सांगतात .सोयराबाई सांगतात सदरे वरील कामकाज संपले आहे दूध घ्या आणि विश्रांती घ्या .बाळराजे म्हणतात दादासाहेबानी थाळा घेतला का ?आम्हला त्यांना भेटायचे आहे .ते शृंगारपूर का जातात ?मग आम्ही पण जातो .दादासाहेब नसतील तर आमचे मन रमणार नाही .सोयराबाई बाळराजे ना समजावतात महाराजांनी त्यांच्या वर कामगिरी सोपवली आहे ती पार पाडावी लागेल महाराजां चा आदेश आहे हे समजावून देतात .
येसूबाई युवराजा ना काहि सांगण्याची विनंती करतात त्या वर युवराज म्हणतात कुलमुखत्यार म्हणून आज्ञा करा .तसे हि आम्हाला आज्ञा फर्मान ऐकण्या ची सवय झाली आहे.येसूबाई म्हणतात आम्ही तुमच्या येसू आहोत . " श्री सखीराज्ञी जयती "
सूर्योदया ला आपण निघू तेव्हा महराजां च्या महाला चा दरवाजा उघडला असेल /नसेल म्हणून महाराजांचे दर्शन आत्ताच घेवून येवू .शंभूराजे म्हणतात आम्ही दर्शन घेतले बंद दरवाजा आड आमच्य गप्पाही झाल्या आणि निरोप हि केव्हाच दिला आहे साधा नाही सरकारी फर्मान काढून .येसूबाई म्हणतात आपण निर्वाणी चा निरोप देताना ते थांबा म्हणतील .युवराज म्हणतात आबासाहेबाना निटस ओळखल नाहीत "निश्चयाचा महामेरू "आहेत ते त्यांचे निर्णय बदलत नाहीत आणि आमचे हि .शंभूराजे जमादारखाना च्या चाव्या हि महाराजा कडे देण्यास सांगतात .
येसूबाई महाराजा कडे चाव्या देतात .महाराज येसूबाई ना शंभूराजे ची समजूत काढण्यास सांगतात राग शांत करण्यास सांगतात .शंभूराजे रुद्र आहेत उमेने थोडा भक्तिभाव दाखवला स्तुती केली की रुद्र शांत होतो .देवाला अनेक फुले आवडतात रूद्रा ला धोतरा फूल आवडते धोतराच्या फुला च्या सुगंधत कसली रसिकता .(खूप छान उदहरण )आमचे शंभू असे आहेत .महराज येसूबाई ना सांगतात आम्ही मोहिमेवर निघालो आणि युवराज रुसून बसले आमचे मन लागणार नाही . येसूबाई सूर्योदया ला गड उतरू असे सांगतात .महराज शंभूराजे च्या महाली त्यांना भेटणार असे सांगतात .उद्या चा सूर्योदय आमच्या साठीशंभूराजे आणि स्वराज्या साठी खूप वेगळा असेल आपल्या मनातील काळोख दूर होतील .
बाळराजे झोपेतून उठून शंभूराजे ना भेटण्या चा हट्ट करतात .आमचा हट्ट दादासाहेबा साठी असतो त्यांच्या पेक्षा प्रिय आम्हाला कोणी नाही .(बंधू प्रेम )
येसूबाई पुतळा मातोश्री आणि सोयराबाई यांचा आशीर्वाद घेतात शंभूराजे ची काळजी घ्या /त्यंच्या वर लक्ष देण्यास सांगतात .स्वतः ची काळजी घ्या -तुम्ही खंबीर राहिलात तर ते डगमगणार नाहीत मागे वळून पाहणार नाहीत .
सूर्योदया ला महाराज आपल्या भेटीला येणार असल्याचे येसूबाई युवराजा ना सांगतात .युवराज सूर्योदया च्या अर्धा प्रहर गड उतार होउ असे येसूबाई ना सांगतात .कारण सूर्योदय ला गड उतार होणार हे सर्वां ना माहित आहे .पुतळा मातोश्री येतील काहिच बोलणार नाहीत बोलेल त्यांची व्याकुळता भरलेले डोळे विनवतील नका जावू .एक पाऊल पुढे जावू शकणार नाही .सोयराबाई मातोश्री शंभूराजे अशी आर्त साद कानी पडेल आणि डोळ्यातील असावा चा पूर नाही थांबवू शकणार .राणुअक्का आमच्या वर जीव ओवाळून टाकणारी आमची बहिण मिटल्या ओठांनी लाख सवाल विचारेल ? कसे जवाब द्यायचे .
बाळराजे रेशीम मिठीत आम्हाला जेरबंद करतील ती बाळमिठी आम्ही आमच्य बोटांनी कशी सोडवावी . आबा ना त्यांचा लाडका शंभू गड उतार होतो हे पाहून त्यांना वाईट वाटेल मन दुखवेल आणि हा सल मनाशी बाळगून त्यांनी मोहिमेवर जाव हे नाही आवडणार आम्हाला ...
ज्या रायगडावर आम्ही विजयी होवून गुलाला ची उधळण झाली सोन्याच्या मोहरा उधळल्या गेल्या .तो रायगड सोडताना अरेरे हे कय अशी सहानभुती ची भीक कोणी भिरकावली तर सहन होणार नाही आम्हाला .माणसंच कशाला रायगडाचे बुरुज आणि कडे आमच्या मान झुकवून पाहतात .ज्याला खाली उतरण्याची सवय नाही तो भगवा आम्हाला गड उतार होताना पाहतो आहे म्हणून सूर्योदया पूर्वी निघू .तयारी ला लागा .परत या महालात कधी येवू माहित नाही .
रायगडा रे रायगडा रे रायगडा रे
रायगडा रे रायगडा रे रायगडा रे
तुझ्या खेळलो अंगा खांद्यावरी
आठवणी ओलांडून जाता वादळ उठते उरी
आठवणी ओलांडून जाता वादळ उठते उरी
रायगडा रे ....
आपण एकदा रायगडावर गेलो तरी आपला पाय तिथून निघत नाही .शंभूराजे ना रायगड सोडताना कसे वाटले असेल ... रायगडा रे ....
- अश्विनी सोनवणे
Comments
Post a Comment