शरद पवारांनी जयंत पाटील यांनाच प्रदेशाध्यक्ष का केले ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना नवी जबाबदारी मिळणार असल्यामुळे नवा प्रदेशाध्यक्ष निवडणे गरजेचे होते.
प्रदेशाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी मधुन 3 नावे आघाडीवर होती.
पहिले नाव होते दिलीप वळसे पाटील
दुसरे नाव होते राष्ट्रवादी चे पक्ष प्रतोद व कोरेगाव चे आमदार शशिकांत शिंदे यांचे व तिसरे नाव होते इस्लामपूर चे आमदार व माजी गृहमंत्री जयंत पाटील यांचे.
खर तर सातारा जिल्ह्याने राष्ट्रवादीला दिलेली साथ पाहता प्रदेशाध्यक्ष पदाची माळ शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात पडेल असाच सगळ्यांचा अंदाज होता.
पण सगळ्यांचे अंदाज चुकवण्याची शरद पवारांची आवड त्यांनी यावेळेसही जोपासत जयंत पाटील यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ घातली व सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
जाणुन घेऊयात राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाच का प्रदेशाध्यक्ष करण्यात आले.
श्री जयंत राजारामबापु पाटील हे नाव महाराष्ट्राला नविन नाहीये.
अभ्यासु अर्थमंत्री,सक्षम गृहमंत्री व कार्यसम्राट ग्रामविकास मंत्री अशी त्यांची ओळख आहे.
जयंत पाटील हे पुर्वीच्या वाळवा व सध्याच्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
२०१४ ला झालेल्या निवडणुकीत जयंत पाटील सलग सहाव्या खेपेस आमदार म्हणुन निवडुन आले.
जयंत पाटील यांचा मोठा उद्योग समुह त्यांच्या मतदारसंघात आहे,राजारामबापु साखर कारखाना, दुधसंघ तसेच RIT नामक ऑटोनॉमस कॉलेज देखिल आहे.
त्यांनी आजपर्यंत हजारो युवकांना रोजगार मिळवुन दिलेला आहे.
युवकांच्या पोटाचा प्रश्न सोडवल्यामुळे युवकांची मोठी फळी आज त्यांच्या मागे आहे.
सत्तास्थाने:
जयंत पाटील यांच्या हातात असलेली इस्लामपूर नगरपालिका २०१६ च्या निवडणुकीत भाजप कडे गेली,भाजपचे निशिकांत पाटील थेट नगराध्यक्ष म्हणुन निवडुन आले.
थेट नगराध्यक्ष जरी भाजपचा असला तरी नगरसेवकांचे संख्याबळ लक्षात घेता जयंतरावांचे पारडे वरचढ ठरते.
इस्लामपूर च्या शेजारचे शहर असलेल्या आष्टा नगरपालिकेत देखिल जयंतरावांची निर्विवाद सत्ता आहे.
आष्टा पालिकेसाठी त्यांची राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्यासोबत अनेक वर्षांपासून युती आहे.
जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात गावोगावी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या शाखा स्थापन झाल्यात.
या सर्व गोष्टींचा विचार करुनच शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी जयंत पाटील यांचे नाव नक्की केले.
Comments
Post a Comment