अभिनेत्री प्रार्थना बेहेरे व अनिकेत विश्वासराव यांचा भीषण अपघात
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीचा लोणावळ्याजवळ अपघात झाला. यामध्ये प्रार्थना बेहरेच्या हाताला मार लागला आहे. लोणावळ्याजवळील वळवणच्या यश रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आज सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
प्रार्थना बेहरे, अनिकेत विश्वासराव आणि प्रार्थनाची सहाय्यक स्वाती हे तिघेही त्यांच्या फॉर्च्यूनर गाडीने मुंबईहून कोल्हापूरला 'मस्का' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी निघाले होते. यावेळी लोणावळा जवळ टेम्पोला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांची गाडी कठड्याला धडकली आणि गाडीतील एअर बॅग्ज उघडल्यामुळे अपघाताची तीव्रता कमी झाली. दरम्यान, अनिकेत हा गाडीत झोपला असल्याने त्याला काही समजलेच नाही. तर प्रार्थनाच्या हाताला मार लागला असून तिची सहाय्यक स्वाती हिच्या डोक्याला जबर मार लागलाय. त्यांच्यावर वळवण येथील यश हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे
Comments
Post a Comment