राजधानी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी उदयनराजेंचे भिडे गुरुजींना निमंत्रण
सातारा प्रतिनिधी :
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले फौंडेशन व पंकज चव्हाण डान्स अकॅडमी सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडणाऱ्या राजधानी महोत्सव २०१८ च्या उद्घाटन सोहळ्यासाठी उदयनराजेंनी भिडे गुरुजींना निमंत्रण दिलेले आहे.
25 ते 27 मे असा तीन दिवसीय राजधानी महोत्सव असणार आहे.
दिनांक २५ मे रोजी किल्ले अजिंक्यताऱ्यावर या महोत्सवाचा शुभारंभ भिडे गुरुजींच्या हस्ते होणार आहे.
यामध्ये अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवशाहीचे दर्शन घडविणारा शिवजागर कार्यक्रम होणार आहे. यामध्ये छत्रपती शिवरायांची जीवनगाथा, लाठीकाठी खेळ, शिवकालिन शस्त्र प्रदर्शन, दांडपट्टा असे मर्दानीखेळ युवक युवती दाखविणार आहेत.
तसेच दिनांक २७ ला छत्रपती घराण्याचा मानाचा पुरस्कार बिग बी अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात येणार आहे.
🙏🙏🙏
ReplyDeleteगुरुवर्य🙏
ReplyDeleteGuruvarya !🚩🙏
ReplyDelete