राजधानी महोत्सवाचे उदयनराजेंकडुन मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

मुंबई प्रतिनिधी,

आज मंत्रालयात श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

साताऱ्यात पार पडणाऱ्या राजधानी महोत्सव सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी ते आले होते.
राजधानी महोत्सवात ३ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याला बिग बी अमिताभ बच्चन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
तसेच छत्रपती घरण्याकडुन देण्यात येणाऱ्या मानाच्या पुरस्काराचे देखिल वितरण होणार आहे.

उदयनराजेंच्या आग्रहाला मान देऊन मुख्यमंत्री राजेंच्या वाढदिवसाला व फुड पार्कच्या  उद्घाटनाला साताऱ्यात आले होते.
त्यामुळे या सोहळ्यासही मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान उदयनराजेंची मुख्यमंत्र्यांसोबतची वाढती जवळीक पाहुन राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते अस्वस्थ झाल्याचे चित्र आहे.

Comments

Popular posts from this blog

संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवदान

संभाजी भिडेंचा तो फोटो पाहुन नेटकरी हळहळले

गडकोट मोहिम प्रचारासाठी भिडे गुरुजींच्या बैठकांचा धडाका