अपक्ष लढुन एकेकाची पुंगी वाजवतो की नाय बघा-उदयनराजेंचा राष्ट्रवादीला इशारा
कराड प्रतिनिधी
आपल्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुन्हा आक्रमक पवित्रा घेतल्याचे पहायला मिळाले.
लोकशाही आहे म्हणुन शांत आहे,राजेशाही असती तर एकेका आमदाराला दाखवले असते असा सज्जड दमच उदयनराजेंनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांना दिला.
मुख्यमंत्री साहेबांसोबत काय चर्चा झाली हे आत्ताच सांगत नाही पण चर्चा झाली एवढं नक्की असही उदयनराजेंनी सांगितले.
शेवटी बोलताना ते म्हणाले अपक्ष अर्ज भरून नाय एकेकाची पुंगी वाजवली तर बघा,पवार साहेबांनी माझ्या कॉलर स्टाईल वरून बोलल्याने मला आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.
Comments
Post a Comment