शिवरायांच्या प्रत्येक किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मुर्ती का असते
महाराष्ट्रात जवळपास ३५० ते ४०० लहान-मोठे किल्ले आहेत.
छत्रपती शिवरायांनी झुंजार मावळ्यांच्या साथीने अनेक किल्ले स्वराज्यात आणले.
आपण निरीक्षण केले असेल तर आपल्याला दिसुन येईल की छत्रपती शिवरायांच्या बहुतांश किल्ल्यांवर मोठं मोठे दणकट प्रवेशद्वार असतात व त्यावर गणपती व अनेक देवदेवतांच्या मुर्त्या असतात.
छत्रपती शिवराय हे देव धर्म मानणारे राजे होते.
श्री तुळजाभवानी ही महाराजांची कुळस्वामिनी.महाराज बोलताना नेहमी जगदंब जगदंब असा उदघोष करत असत.
त्याचप्रमाणे महाराजांची भगवान शंकरावर अपार श्रद्धा होती.
म्हणुनच हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ महाराजांनी रायरेश्वरच्या महादेवाच्या पिंडीसमोर घेतली होती.
छत्रपती शिवाजी महाराज देवी देवतांचे उपासक असल्यामुळेच किल्ल्यांवर गणपती हनुमान व इतर देवदेवतांच्या मुर्त्या दिसुन येतात.
महाराजांची देवांवर श्रद्धा होती परंतु त्यांचा भविष्यावर नव्हे तर मनगटावर विश्वास होता अन त्याच कणखर मनगटातून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न सत्यात उतरले.
या बातमीचे दिलेले हेडिंग आणि आपण दिलेली माहिती यात तफावत आहे, गणपतीच मूर्ती का असते असे आपण म्हटले आहे, त्याचे उत्तर हे होत नाही, त्या पेक्षा प्रत्येक प्रवेश द्वारावर देवतांच्या मूर्ती का असतात असे म्हटले पाहिजे होते.
ReplyDeleteSalil yanchyashi 100% sahmat
ReplyDelete