मराठा पगडी आणि तिचे प्रकार

मराठा पगडी आणि तिचे प्रकार.

मित्रांनो
(हा लेख फार पूर्वी मी एका ग्रुप वर प्रसिद्ध केला होता. परंतु वाचकांच्या सततच्या मागणीमुळे हा लेख परत प्रस्तुत करत आहे.)

मराठा पगडी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून प्रसिद्ध पावली.

ह्यात छत्रपती शिवाजीमहाराजांचा शिरेटोप सोडला तर
सगळे मराठा सेनापती, सरदार, मावळे लोक हे माझ्या फोटोत डोक्यावर जी पगडी आहे ह्या पद्धतीची पगडी वापरत असत.

ब्राम्हण लोक ब्राम्हणी गोल पगडी वापरत असत; ज्याला अलीकडच्या काळात टिळक पगडी असेही म्हणतात. (आजकाल आपण त्याला पुणेरी पगडी म्हणतो. अर्थात पुण्याचा आणी ब्राम्हणी गोल पगडीचा काहीही संबंध नाही.) मुळातच पुनवडी म्हणजे पुणे हे काही ब्राम्हणांचे गाव नाही. पुणे आहे झाम्बरे पाटलांचे, बहिरट पाटलांचे, शिरोळे पाटलांचे. ही सगळी मराठा मंडळी आहेत. त्यामुळे पुणे मुळातच मराठ्यांच गाव आहे. असो.

मराठा पगड्यांमध्ये विविध प्रकार आहेत. ते प्रकार असे: मावळी पगडी, सातारा छत्रपती पगडी, कोल्हापुरी छत्रपती पगडी, ग्वाल्हेरच्या शिंद्यांची शिंदेशाही पगडी, बडोद्याच्या गायकवाडांची पगडी, धार-देवासच्या पवारांची पगडी, नागपूरकर भोसल्यांची पगडी, मुधोळकर घोरपड्यांची पगडी, कदम सरदारांची पगडी, होळकर पगडी आणी अश्या बऱ्याच प्रकारच्या मराठा घराण्यांच्या मराठा पगड्या आणि त्यांचे विविध प्रकार आहेत.

आपण आपला हा इतिहास जपला पाहिजे आणि हट्टाने आपल्या शुभ कार्यांमध्ये वापरला पाहिजे.

ह्यापुढे आपण सर्वांनी सत्कार समारंभात पाहुणे मंडळींसाठी ह्याच मराठा पगडीचा वापर करून आपल्या शुरांच्या बलिदानाची आठवण ठेवावी ही विनंती.

आपली लग्नकार्ये आणि इतर सण उत्सवांमध्ये, समारंभांमध्ये आवर्जून आपली मराठा पगडी वापरून आपली मराठा संस्कृती जपावी म्हणून हा खटाटोप.

श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम निरंतर.

Comments

Popular posts from this blog

संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवदान

संभाजी भिडेंचा तो फोटो पाहुन नेटकरी हळहळले

गडकोट मोहिम प्रचारासाठी भिडे गुरुजींच्या बैठकांचा धडाका