मावळ्यांच्या वेशभूषेतील वेटर उभे करणाऱ्यांना सणसणीत चपराक मारणारा लेख
काही वर्षांपूर्वी एक फॅशन आली की लहान मुलांच्या कार्यक्रमात मिकी माउस चे कपड़े घातलेली माणसे करमणूक करण्यासाठी वापरण्यात आली.नंतरनंतर तर हा समाजासाठी आकर्षणाचा विषय ठरु लागला व पुढे तो प्रतिष्टेचा मुद्दा म्हणुन कमी पडला की काय म्हणून आम्ही आज थेट मावळ्यांच्या पेहरावातील माणसे उभी करायला लागलो!!!आजकाल लग्नकार्य,सार्वजनिक कार्यक्रम यामध्ये हौस म्हणुन पगड़ी घातलेले मावळे दिसतात.कधी अक्षता वाटताना तर कधी स्वागत करतांना कधी द्वारपालाच्या रुपात तर कधी अजुन काही.खरच याचे गांभीर्य समजून घेउ शकलो का आम्ही?
आई भवानीचा आशीर्वाद घेत,छत्रपती शिवरायांचे हिन्दवी स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगत आसुरी राजवटीला टक्कर देणारे मावळे!साड़े तिनशे वर्षांनंतर गुलामगीरीच्या काळोखात "हर हर महादेव" चा नारा देत मुघलांच्या घोडयांनासुद्धा समोर असलेले पाणी पिता येणार नाही,अशी जरब बसवणारे मावळे!कधी मुघलांच्या छावणी वरून सोन्याचा कळस कापुन नेणारे मावळे तर कधी महाराजांच्या रूपात लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणून हसत-हसत स्वत:ची तसेच प्रसंगी कुटुंबाचीही आहुती देणारे मावळे!स्वराज्य गीळायला आलेल्यांची महाराष्ट्रतच कबर बांधणारे मावळेे तसेच कधी दिल्ली जिंकणारे तर कधी अटकेपार झेंडा लावणारे मावळे!कधी गनिम काव्याने शत्रुला हतबल करणारे मावळे तर कधी वारा पाउस काळोख कशाचीही तमा न बाळगता सह्याद्रीला घोड़्याच्या टापांखाली चिरडत ताब्यात ठेवणारे मावळे!!!!आणि आम्ही काय केले?तर त्याच मावळ्याचे वेश परिधान केलेल्या व्यक्तींना कार्यक्रमात उभे करण्यात प्रतिष्ठा मानली???सांस्कृतिक पतन घडते ते असेच जाणून किंवा अजाणतेपणाने.
अख्खे जग ज्यांचे गुलाम होते,ज्यांचे साम्राज्यावरून कधी सूर्य मावळत नव्हता त्यांचे कपडे घालून आमचे बैंडवाले ढोल बडवतात तशी अवस्था व्हायला आपल्याला वेळ लागणार नाही. तलवारीचे घाव सोसत कुटुंबाला तिलांजली देणाऱ्या महाविरांना मावळ्यांच्या पोशाखातील बुजगावणे म्हणुन जर आम्ही उभे करु तर तो लाखो लाखो बलिदानांचा अपमान ठरेल.मित्रांनो,आपला मावळा हा मानाचा प्रतिष्ठेचा मानबिन्दु असून त्या पोशाखातील पावित्र्य जपणे व त्याला मान देणे,हे आपले कर्तव्य आहे.
चुकुनही या पुढे असे प्रकार होउ नए यासाठी आपण सर्व काळजी घेउ,हीच आशा बाळगतो.
"ना चिंता ना भीती,मनी फक्त छत्रपती."
जय हिन्द
केदार गोगरकर,
अगदी बरोबर आहे
ReplyDelete