सव्वा वर्षात ३२ मण सुवर्ण सिंहासन स्थापन होईल-भिडे गुरुजी
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ह्या संघटनेच्या वतीने मागील वर्षी 4 जुन रोजी किल्ले रायगड येथे ३२ मण सुवर्ण सिंहासन स्थापन करण्याचा संकल्प करण्यात आला.या संकल्पाच्या वेळी हजारो शिवपाईक उपस्थित होते
याच सुवर्ण सिंहासनाच्या निर्मितीसाठी आयोजित जाहीर सभेत भिडे गुरुजी बोलत होते.काल दिनांक ६ रोजी गांधी मैदान सातारा येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेत बोलताना श्री.भिडे म्हणाले सुवर्ण सिंहासनाच्या कामाला महाराष्ट्रातून अफाट प्रतिसाद लाभत आहे,येत्या एक ते सव्वा वर्षात हे सिंहासन स्थापन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सिंहासनासाठी १२४० किलो सोने वापरण्यात येणार असुन शिवरायांची ६५ किलोंची मुर्ती देखील सोन्याची बनवण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment