निलेश राणेंच्या त्या वक्तव्याचे भिडे गुरुजी समर्थकांकडुन स्वागत.
आगामी काळात निलेश राणे विरुद्ध प्रकाश आंबेडकर यांच्यातील शाब्दिक संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाचा बट्याबोळ केला अस विधान प्रकाश आंबेडकर यांनी केल्यानंतर त्याला निलेश राणे यांनी अत्यंत आक्रमक प्रत्युत्तर दिलेले आहे.
दरम्यान निलेश राणे यांचे एक वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहे,प्रकाश आंबेडकर एक दिवस सुद्धा संभाजी भिडे यांना जेलमध्ये पाठवु शकले नाहीत असं वक्तव्य राणे यांनी केलेलं होत त्यांच्या या वक्तव्याचे भिडे गुरुजी समर्थकांनी स्वागत केले आहे.
राणे कुटुंबीय पुन्हा हिंदुत्ववादाकडे वळले तर मोठा जनाधार त्यांच्या मागे उभा राहील अशी प्रतिक्रिया देखील काही फेसबुक युजर्सनी दिली.
Comments
Post a Comment