आता बँका राहणार दर शनिवारी सुद्धा बंद
मुंबई, ता. १२ :
१ जूनपासून रविवारसोबतच शनिवारीही
बँकेत जाऊन व्यवहार करता येणार नाहीत.
कारण देशातील सर्व बँका दर शनिवारी बंद राहतील.
बँक कर्मचाऱ्यांच्या पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी रिझर्व बँकेने मंजूर केली असून
बँकाचा कामकाजाचे दिवस आठवड्यात केवळ पाच असतील.
मात्र त्या बदल्यात आता सर्व बँका सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत ग्राहकांच्या सेवेत खुल्या राहणार आहेत
Comments
Post a Comment