प्लास्टिकमुक्त रायगड करण्यासाठी युवराज संभाजीराजे सरसावले.

दरवर्षी ६ जून रोजी दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. यावर्षी देखील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून 'प्लास्टिकमुक्त रायगड' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

५ जून रोजी असणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाचे आंतरराष्ट्रीय यजमानपद 'युनेस्को' ने भारताकडे सुपूर्द केले आहे. "प्लास्टिक प्रदूषणाशी लढा" हि संकल्पना घेऊन भारत या पर्यावरण दिनाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणार आहे. प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण हे पर्यावरणास अत्यंत घातक ठरत असून यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललेला आहे.  या शिवराज्याभिषेक दिनी आपण प्लास्टिकमुक्त गडकोटांचा संकल्प करुन याची सुरुवात जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक महोत्सवाच्या निमित्ताने ५ जून रोजी दुर्गराज रायगडावरुन करणार आहोत. यादिवशी 'प्लास्टिकमुक्त रायगड' हा उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमांतर्गत किल्ले रायगडावरील सर्व प्लास्टिक कचरा हटविण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये शिवभक्तांनी आपला सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन आम्ही करीत आहोत.

या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी शिवभक्तांनी पुढील लिंकवरील फॉर्म भरुन आपली नोंदणी करावी.

http://bit.ly/rajyabhishek2018

Comments

Popular posts from this blog

संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवदान

संभाजी भिडेंचा तो फोटो पाहुन नेटकरी हळहळले

गडकोट मोहिम प्रचारासाठी भिडे गुरुजींच्या बैठकांचा धडाका