युवराज संभाजीराजेंच्या पुढाकाराने होतोय रायगडाचा कायापालट.
गेल्या काही महिन्यांपूर्वी शासनाने रायगड संवर्धनाची घोषणा केली होती 700 कोटी रायगडच्या विकासासाठी मंजूर झालेले होते , परन्तु राजगड आणि तोरणा किल्ल्यांवर झालेलं संवर्धन पाहता बाबांनो तुम्ही काही करू नका ! असे म्हणायची वेळ आली होती इतके भयानक काम संवर्धनाच्या नावा खाली चालू होते , त्यामुळे इकडे रायगड वर पण आधुनिक पद्धतीने बांधकाम करून असाच राडा घातला जाणार असे वाटत होते . तसेच फक्त निवडणुकीच्या अंगावर आम्ही काहीतरी केले असे मतदारांना दाखवण्या साठी केली जाणारी धडपड असावी असा प्राथमिक अंदाज होता।
म्हणूनच काम सुरू होऊन काही महिने लोटलेले म्हणून मागच्या आठवड्यात पाहणी साठी एक भेट रायगड ला दिली। मुळातच आजवरचा वाईट अनुभव डोळ्या समोर ठेवूनच गेलेलो होतो परन्तु थोड्याच वेळात किल्ल्यावरची कामाची पद्धत पाहून आश्चर्याचा धक्काच बसला ।
होय खरंच , कारण किल्ल्यावर कुशावर्त तलावाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात व अत्यन्त कायजी पूर्वक उत्खनन चालू होते , आपल्याच वयाची 7 8 मुले उत्खनन करत होती व एक एक पुरावा अत्यन्त कायजी ने संभाळून बाजूला करत होती। इतिहास उकरून काढण्याची त्यांची ती भर दुपारच्या उन्हात चाललेली धडपड पाहून तळपत्या उन्हात सुद्धा मनाला सावलीचा थंडावा लाभला।
अपेक्षित होत की प्रेक्षणीय व दर्शनिय भागातच फक्त दिखाऊ काम चालू असेल परन्तु 12 टाके सारख्या दुर्लक्षित जिथे पर्यटक पण जात नाहीत अशा टाक्यातील गाळ काढण्याचे काम चालू होते। मुद्दाम मी ते पाहण्या साठी गेलो तेव्हा समजले फक्त गाळ काढला नाही जात आहे तर तो वाळवून चाळून त्यात काही सापडते का ह्याचा सुद्धा अभ्यास चालू होता । पाहून खरंच समाधान वाटले। तेवढ्यात एका कामगारा चा आवाज आला सर इथे काहीतरी सापडलंय.....
ऐकताच उत्सुकता शिगेला पोहचली आणि धावतच जाऊन तिथे पाहिले तर मोठ्या आकाराची शिवकालीन घरातील महादेवाची पिंड तिथे रुतून बसलेली। नक्की कोणाच्या घरातील हे शिवलिंग असावे ???? महाराजांच्या घरातील तरी नसावी????
असे अनेक खजिने किल्ल्यावर रोज सापडताहेत म्हणून किल्ल्यावरील उत्खनन विभागाचे नेतृत्व करणाऱ्या श्री वरुण भामरे यांना या कामाची विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळण्या ऐवजी संपूर्ण कार्याची पद्धत त्यांनी अतिशय सखोलतेने समजावली तसेच आजवरच्या झालेल्या कार्यवर सुद्धा प्रकाश टाकला।
5 महिने सलग सुट्टी न घेता त्यांची चाललेली हे प्रामाणिक धडपड पाहून फार कौतुक वाटले त्यांचे।
आजवर अनेक छोट्या मोठ्या पण महत्वाच्या गोष्टी किल्ल्यावर सापडलेल्या आहेत ज्यांचे प्रदर्शन 6 जून ला सर्वांसाठी खुले केले जाणार आहे।
काम पाहून खरंच मनोमन समाधान झाले की रायगड अतिशय योग्य व्यक्तींच्या हाती दिलेला आहे , कारण सर्वात महत्वाचे म्हणजे याचे नेतृत्व कोल्हापूर चे संभाजी राजे करत आहेत हे तर आपल्याला माहीतच होते परन्तु उत्खननाचे आणि संवर्धनाचे कार्य करणारी सम्पूर्ण टीम ही मराठी तरुण मुलांची आहे। सर्वाना आपल्याला हे काम करण्याची संधी मिळाली याचे अपार कौतुक आहे आणि त्यामुळेच त्यांच्या कामात कमालीची जिद्द आणि आस्था आहे।
किल्ल्यावरचे कार्य असेच चालू राहिले तर लवकरच रायगडच्या इतिहासाची अनेक पाने नव्याने लिहावी लागणार हे निश्चित।
त्यामुळे अगदी मनापासून आम्ही सर्व दुर्गप्रेमी रायगड प्राधिकरण टीम चे खूप खूप आभार मानतो। 🙏🙏🙏🙏
( मार्गदर्शनाबद्दल वरुण भामरे व आदित्य कराड यांचे विशेष आभार )
- सत्यजीत भोसले
🚩सेवेचे ठायी तत्पर 🚩
Excellent. RAIGAD SHOULD BECOME SOURCE OF INSPIRATION FOR YOUNG GENERATION. WE SHOULD RESTORE RAIGAD AND BRING BACK ITS GLORY.
ReplyDelete