गरोदरपणात पाहिली स्वराज्यरक्षक संभाजी मालिका:पोटी जन्मला तेजस्वी पुत्र

गरोदर पणाच्या काळात स्वराज्य रक्षक संभाजी मालिका पहिली व एक तेजस्वी पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आला.

राहुल बिचकर व पत्नी अमृता बिचकर यांना आलेला अनुभव त्यांच्या शब्दात :

माझ नाव राहुल बजरंग बिचकर आणि माझ्या पत्नीच नाव अमृता राहुल बिचकर  .मी येराड (बनपेठ )ता .पाटण येथे राहतो .आणि कराड येथे हाॅटेल अलंकार मध्ये शेफ आहे. माझ लग्न होऊन फेब्रुवारीला एक वर्ष पूर्ण झालं आंणि माझा मुलगा 5 मार्च ला जन्माला .तर माझ्या आई वडीलांना मला आंणि माझ्या पत्नीला पहिल्या पासून महाराजांच खुप वेड आहे .आणि तुमच्या राजा शिवछत्रपती आणि स्वराज्य रक्षक संभाजी ह्या मालिका रोज न चुकता पाहतो आणि मी नोकरीला असल्याने मी मोबाईलमध्ये रात्री सुट्टी झाल्यावर पाहतो .तर मझी पत्नी गरोदर होती त्यावेळी मालिका पाहायची आणि बरोबर शिर्षक गीत चालू झाल्यावर तिच्या गर्भात जोर जोरात हालचाल चालू व्हायची आणि ती मला सांगायची की अस होतय मी बोललो चांगली गोष्ट आहे. अस रोज चालू असायच मी सुध्दा  पाहिलंय मग मला पटलं. आणि मला बरेच मित्रांनी मला सांगीतले की गर्भसंस्कार किंवा ग्रंथ अस काही तरी वाचायला दे .आणि माझ्याकडे  छावा कादंबरी आहे मी रोज वाचतो.मग मी पत्नीला वाचायला दिली  आणि मला बरेच मित्रांनी मला सांगीतले की हे नको देऊ वाचायला पण मी कोणच काही ऐकलं नाही आणि वाच बोललो काही होणार नाही तु लक्ष देऊ नको .मग रोज न चुकता वाचलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या पत्नीला वाचायला येत नव्हते मग घरी आईवडीलांनी वाचायला शिकवले मी सुध्दा शिकवले. मग ती शिकली आणि मोडकतोडक वाचुन पुर्ण केल.आणि  माझा मुलगा झाल्यानंतर तो शिर्षक गीत चालू झाल्यावर झोपला असेल तर जागा होतो आणि ओरडतो किंवा इकडे तिकडे पाहतो आणि मी गम्मत म्हणून मोबाईल वर त्याच्याजवळ शिर्षक गीत चालू करतो मग हसतो नाहीतर शांत राहतो .मस्तच वाटत अभिमान वाटतो. आणि डोळ्यासमोर दिसतो.

Comments

  1. त्याचे नाव शंभुराजे ठेवा

    ReplyDelete
  2. Jaaam bhari
    Swarajya Rakshak Sambhaji Serial ahech tevdhi bhari👍👍😊😊

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवदान

संभाजी भिडेंचा तो फोटो पाहुन नेटकरी हळहळले

गडकोट मोहिम प्रचारासाठी भिडे गुरुजींच्या बैठकांचा धडाका