भारत-चीन सीमेवरील शिवस्मारकाला संभाजीराजेंनी दिली भेट

भारत -चीन सिमेवर उभारलेल्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या आश्वारुढ पुतळ्याला ( मुर्ती )  भारतीय परराष्ट्र स्थायी समिती सदस्यांनी दिली भेट...!

छत्रपती  संभाजीराजेंचा पुढाकार.

भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या सदस्यांचा डोकलाम,  मेघालय येथे अभ्यास दौरा चालू असून, देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने या भागाचे असलेले महत्व लक्षात घेता आपल्या सैन्याची सध्यस्थिती, त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी हा दौरा आयोजित केला आहे.

या दौऱ्या दरम्यान तंवांग येथे मराठा लाईफ इन्फंट्रीच्या वतीने अत्यंत दुर्गम भागात २२ कि.मी.लांबीचा रस्ता तयार केला आहे. हा रस्ता भारत-चीन सीमेकडे जाणारा मोठा दुवा आहे. सीमेवरील सैनिकांना रसद पुरवण्यासाठी हा खास रस्ता उभारला गेला असून या रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असे नाव देण्यात आले आहे. या ठिकाणी मराठा मैदान देखील आहे. या मैदानावर छत्रपती शिवाजीमहाराजांचा अत्यंत देखणा छत्र धारण केलेला अश्वरुढ पुतळा आहे. शिवछत्रपतींच्या या स्मारकाला आज  या शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी छत्रपती शिवरायांचे वंशज राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी  स्थायी समीती अध्यक्ष शशी थरुर, म्हणाले, आम्ही आमचे सौभाग्य समजतो  की डोकलाम सारख्या देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकाला त्यांच्याच वंशजांच्या उपस्थितीत भेट देण्याची संधी मिळाली  मी सर्व सदस्यांच्या वतीने संभाजीराजेंचे आभार मानतो की, त्यांनी या सगळ्यासाठी पुढाकार घेतला.

या कार्यक्रमाला अशरद त्रिपाठी, जोसे मनी, सुगदा बोस, लष्करी अधिकारी मेजर जनरल झा, कमांडर एम.पी.सिंग, मिलट्री आँफीस इनचार्ज मेजर जनरल व्ही.के. सिंग,डेप्युटी कमांडर कोल झाकर,अनेक लष्करी अधिकारी व मराठा लाईफ इन्फंट्रीचे  शुरवीर जवान उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवदान

संभाजी भिडेंचा तो फोटो पाहुन नेटकरी हळहळले

गडकोट मोहिम प्रचारासाठी भिडे गुरुजींच्या बैठकांचा धडाका