स्वराज्य रक्षक संभाजी मालिका : भाग क्रमांक १९८
पुतळा मातोश्री सोयराबाई रात्रीच्या थाळया साठी शंभूराजे ची वाट पहात असतात .येसूबाई शंभूराजे ना बोलवायला जावून खूप वेळ झालेला असतो म्हणून काळजीत असतात .रात्रीचा थाळा सर्व एकत्र घेतो हे माहित असून उशीर का ? शंभूराजे आले नाहीत तर महराज थाळा घेणार नाहित म्हणून दोघी खूप अस्वस्थ असतात .महराज येतात थाळे का लावले नाहीत ?
शंभूराजे जेवायला का आले नाहित ?असे विचारतात राज्याचे निर्णय वेगळे आणि कुटूंबा चे वेगळे. कुटुंबाचा एक नियम आहे संध्याकाळ चा थाळा सर्वानी एकत्र घ्यायचा .
शंभूराजे खूप रागात असतात .येसूबाई कुठे होतात विचारतात .आम्ही कुठे होतो कय करतो या प्रत्येक गोष्टी ची खबर द्यायला हवी का ? .येसूबाई सांगतात
जेवणा साठी महाराज थांबलेत . शंभूराजे येणार नाही म्हणतात .येसूबाई काय कारण सांगू विचारतात. बाबा आले तेव्हा तूम्ही न जेवता उठून गेलात त्यांचा नाही पण अन्नाचा अवमान झाला . शंभूराजे एकांत मागतात .येसूबाई महाराजाना कय सांगू विचारतात .शंभूराजे म्हणतात त्यांचे नाव घेवून आमच्या वर दडपण आणू नका .येसूबाई म्हणतात मातोश्री चा आदेश होता एकत्र थाळा घ्यायचा .
महाराज शंभूराजे साठी जेवायचे थांबतात शंभूराजे ची तयारी झाली का विचारतात .पुतळा मातोश्री सांगतात मोहिमेवर जाण्या साठी संदुका तयार होत्या त्या फक्त शृंगारपूर ला घेवून जयच्या आहेत .
येसूबाई पुतळा मातोश्री ना सांगतात युवराज रागात आहेत येणार नाहीत .आमच्या वर रागावले .
पुतळा मातोश्री च्या स्पर्शाने युवराज त्यांना ओळखतात .मातोश्री म्हणतात स्पर्शाने ओळखता मग मन का ओळखत नाही .शहाण माणूस अस वागत का ?
शंभूराजे सांगतात आमची समजूत घालू नका .
आमच्या शिवाय मोहीम होते मग जेवण का होणार नाही .आमच्या हातातला नाही तर तोंडातला घास परत फिरतो .पुतळा मातोश्री सांगतात .. आमचे एेकाल पुन्हा वर्ष दीड वर्ष अशी पंगत बसणार नाही .बाप लेक एकत्र जेवण करतील त्यांना डोळे भरून पहाव त्यांना आग्रह करावा त्यानी पोटभर खावे पण आमचे भाग्य कुठे .नका येवू ..
शंभूराजे विचारतात आम्ही कुठे चुकतो का ?
पुतळा मातोश्री सांगतात आम्हला तुमचे राजकारण माहित नाही कारण आम्हला आमच्या मर्यादा ठावूक आहेत .त्या सांगतात आपण हि खूप वेळा अपमान सहन केला पण कधी बोलून दाखवले नाही .आऊ साहेबांची शिकवण सांगतात .आपल्या घरातील माणसा समोर कमी पणा घेतला तर नुकसान होत नाही .नेताजी काका मुघलांना मिळाले त्याचा धर्म बदलला मुळे बोलणी खात होतो .पण दम धरला उतावीळ पणा केला नाही .
आपण रागाचे पागोटे घेवून फिरत आहात .आई च्या नात्याने सांगतो आबासाहेबा वर रुसु नका .शंभूराजे म्हणतात आबासाहेबा ची आमच्यावर माया राहिली नाही .माया नाही !!आई बाप आपण मायाळू असल्या ची दवंडी पिटत नाहीत .
शंभूराजे जेवणा साठी जायला तयार होतात पण आबा नी विषय काढला तर गप्प बसणार नाही .
सोयराबाई महाराजाना जेवण करून घ्यायला सांगतात .महाराज सांगतात आम्ही शंभूराजे साठी थांबलो आहोत .शंभूराजे सांगतात आमच्या साठी थांबू नये .महराज सांगतात सुरवात करवी ! ऐकता ना ? शंभूराजे म्हणतात ऐकतच आलो आजवर सगळ्या गोष्टी ऐकल्या .नाही म्हणलो नाही हि चूक झाली .महाराज म्हणतात इथे आपण आमचे पुत्र म्हणून आपल्या मनातील सांगू शकता .
आबा घेवून चला आम्हला !युवराज पद नको रायगड नको स्वराज्य नको फक्त तुमची सावली हवी.
महाराज सांगतात निर्णय बदलणार नाही तो स्वराज्याच्या प्रतिष्ठेला साजेसा नाही .
शंभूराजे -आमच्या प्रतिष्ठेचा कडेलोट होतोय असे वाटत नाही ?
महराज सांगतात एथे प्रत्येकाला प्रतिष्ठेन जगता याव म्हणून स्वराज्य उभारणी केली .निर्णय बदलणार नाही .आमच्याशी बोलताना गळ्यात 64 कवड्या माळ आहे याचे भान असू दे .
शंभूराजे नमस्कार करुन उठून जातात .महाराजही थाळा घेत नाही .
येसूबाई शंभूराजे ना सांगतात महाराजा विषयी गैरमेळ करून घेवू नये .
पुतळा मातोश्री महाराजा ना म्हणतात लेकरु ताटा वरून उठून गेल बर दिसत नाही .महाराज म्हणतात आम्हाला वाटले आम्ही त्यांना भरल्या ताटा वरून उठवले .(दोघानाही खूप वाईट वाटत )
येसूबाई झोपण्यासाठी सांगतात शंभूराजे म्हणतात उद्या रायगड सोडायचा झोप लागेल ....
महराज शंभूराजे ना भेटून त्यांची समजूत काढण्याचे ठरवतात .तसेच एकत्र पाचाड ला उतरून दोन गाव सोबत करू असे ठरवतात ...
- अश्विनी सोनवणे
Comments
Post a Comment