चाटे कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांनी भिडे गुरुजींसमोर मागितली होती कान पकडुन माफी.

सदरची घटना दोन वर्षांपूर्वीची असली तरी महिला सुरक्षेचा प्रश्न देशात गाजत असल्यामुळे ही घटना पुन्हा नव्याने व्हायरल झालेली आहे.

चाटे कोचिंग क्लासेस मध्ये एका शिक्षकाने सलग 15 दिवस आपल्या एका धारकर्याच्या बहिणीला मानसिक त्रास द्यायचा प्रकार केला.सदर मुलीने हा प्रकार बदनामीच्या भीतीने कोणासही सांगितला नाही.परंतु काल त्याच शिक्षकाने सदर मुलीस तिचे वडील भेटायला आलेत असा बहाणा करुन तीला वरच्या मजल्यावर पाठवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.सदर मुलीने त्यातून आपली कशीबशि सुटका करुन घेतली आणि बाथरूम मध्ये बंद होऊन सदर प्रकार आपल्या भावाला सांगितला..

तिचा भाऊ पालकांना घेवून क्लासमध्ये गेल्यावर तिथल्या स्थानिक शिक्षकांनी त्या वासनांध शिक्षाकाची बाजू घेवून त्याला वाचवण्याचा निर्लज्ज प्रकार केला. हा प्रकार श्रीशिवप्रतिष्ठान,हिन्दुस्थानचे कार्यवाह श्री.नितिनदादा चौगुले यांना समजताच त्यांनी तड़क क्लासकड़े धाव घेतली. त्या शिक्षाकाला ताब्यात घेण्याची मागणी करता बाकी शिक्षकांनी त्या वासनांध शिक्षकास वाचवण्याचा प्रकार करुन शिक्षक या पदास काळीमा फासला.अखेर त्या शिक्षकास श्रीशिवप्रतिष्ठान,हिन्दुस्थानचा प्रताप दाखवला.त्या शिक्षकाचा कान एकाच फटक्यामध्ये तोडून नितिन दादानी शिवसूर्यजाळ काय असतो ते दाखवून दिले.शिवसूर्यजाळ पाहताच बाकी शिक्षक नमले.नंतर त्या दोषी शिक्षकास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

नंतर दिवसभर त्या चाटे कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांनी  विविध प्रलोभने अगदी आर्थिक प्रलोभने दाखवून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला पण नितिनदादा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडले नाहीत..

नितिन दादा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडत नसल्याचे पाहुन त्या शिक्षकांनी गुरुजीना भेटून यातून मार्ग काढ़ण्याची विनंती केली. गुरूजी बोलले,"नितिनने जे केले ते योग्यच केले, त्याला श्रीशिवछत्रपती समजले आहेत.फ़क्त ज़रा कमीच समजले नाहीतर त्या भड़व्याला थेट ठारच करायला हवे होते."

त्यावर त्या शिक्षकानी भिवुन गुरुजीना यातून काही मार्ग काढ़ण्याची विनंती केली असता गुरूजी बोलले,"नितिन हा प्रतिष्ठानचा जूना कार्यकर्ता आहे,तो जे करेल ते योग्यच असेल." त्यावर त्याशिक्षकांनी त्यामुलीची आणि तिच्या पालकांची माफी मागण्याची तयारी दर्शवली.त्यावर नितिनदादा बोलले की," माफ़ी तर मागावीच लागेल,पण ती सर्व जनतेच्या समोर,मिडियाच्या समोर,आज आम्ही सकाळी 11 वाजता येणार आणि माफीनामा घेवून जाणार.."

ठरले, सर्व धारकरी 10.30वाजता शिवतीर्थावर जमले, 37अ कलम लागू असल्याने जमावबंदीचा आदेश होता.त्यासाठी आधी कलेक्टर ऑफिसमध्ये जावून त्याना झालेल्या प्रकाराची कल्पना दिली तसेच आपण काय करणार आहोत हे श्री.भिड़े गुरूजीनी सांगितले.लगेच कलेक्टरसाहेबानी हा सामाजिक मुद्दा असल्याने निदर्शानास परवानगी दिली आणि 37अ कलम रद्द केले...

चाटे कोचिंग क्लासेसजवळ जावून आपल्या धारकरी लोकांनी निदर्शने करण्यास सुरुवात केली.शिक्षकांना बाहेर बोलावून माफ़ी मागावी अशी विनंती केली, पण त्यांनी भिउन बाहेर येण्यास नकार दिला......धारकऱ्यांचा संयम परत संपला आणि चाटे कोचिंग क्लासेसचा प्राचार्य जमादार यावर जोरदार थपडीच्या आवाजाने प्रकट झाला... धारकरी लोकांनी क्लास फोडण्याच्या घोषणा देताच गुरुजीनि परिस्थितीचा ताबा घेतला आणि संतप्त जमावास शांत केले.

पुढे त्या शिक्षकांना कान पकडून उठाबशा काढायला लावून "आम्ही गु खाल्ला,आमच्या कडून विकृत,वासनान्ध व्यक्तीला पाठीशी घालण्याचे पाप झाले,त्याबद्दल आम्ही माफ़ी मागतो,आणि आजपासून हा क्लास बंद करतो"हे वदवून घेतले...

या आन्दोलनाचा अखेर श्रीशिवप्रतिष्ठानच्या रीतीने प्रेरणामंत्र,ध्येयमंत्र म्हणून झाला..
अखेरीस नितिनदादा चौगुले बोलले की असा प्रकार कोणत्याही ठिकाणी आढ़ळुन आल्यास आम्हाला सांगा...याबद्दल आपल्याला न्याय मिळवून देण्यास आम्ही कटिबध्द आहोत...

श्रीशिवछत्रपती यानी आपल्या हिंदवी स्वराज्याची सुरुवातच बलात्कारी व्यक्तिस शासन देवून केलेली... त्यांचाच आदर्श समोर ठेवून यासाठी कोणत्याही पातळीवर जाण्यास सिद्ध असणाऱ्या नितिनदादा चौगुले यांचे आणि त्यांना ही प्रेरणा देणाऱ्या श्री.भिड़े गुरूजी यांचे सर्व सांगलीकरानी अभिनन्दन केले...

जागोजाग असेच शिवाजी संभाजी रक्तगटाचे तरुण असतील तर बलात्कार,विनयभंग सारखे प्रकार करणाऱ्याना चाप बसेल...बसेल नाही तर असे प्रकार घड़णारच नाहीत...

तेव्हा जिथे सूर्य उगवतो अशा सर्वच वाड्यावस्त्यात शिवाजी,संभाजी हे दोन महामृत्युंजय मन्त्र पोचवुन तिथे शिवाजी संभाजी रक्तगटाची तरुण पीढ़ी निर्माण करुन एक आदर्श,नैतिक,चारित्रशील भारतमातेच्या कपाळावरील स्वातंत्र्याचे,हिन्दुत्वाचे कुंकु टिकवण्यास कटीबद्ध असणारा हिन्दू समाज निर्माण करुयात.

।। राष्ट्रात निर्मू अवघ्या शिवसूर्यजाळ ।।

(#_Repost)

Comments

  1. Abhinandan श्रीशिवप्रतिष्ठान ... Mast kela tumhi .. Chate class la chataya lavle ki ... We should take cue (ideas) from Bahubali movie, in which the minister's fingers are cut by Devsena. But we should not be hasty in taking Bahubali's step of killing the minister. Instead we should make him Napunsak ( something similar to what Muslims do .... ABC, cut the "O" ring) & let the culprit live till his actual time is up. In that way he will be able to think ... what or how it is .... to use force on a female. He should be allowed to live so that he can preach others his real life experience re : the above incident. I would like to request here 1 more task. Very normally we hear obscene abuses every where on Mother & Sister. I request श्रीशिवप्रतिष्ठान to take up this Mohim and wipe out this abuse from Maha Rashtra, then I would really believe that this Rashtra has become "MAHA". Very spontaneously we seem to hear this abuse, this is such an insult to our very own Mothers .. Sisters .... our very own Jananis. Shivaji was inspired strongly because of Jija MAI ... yes ... we know this & strongly believe too ... & in our day to day lives ... we just unconsciously seem to be using the above abuses .... Abhinandan once again ... श्रीशिवप्रतिष्ठान ...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवदान

संभाजी भिडेंचा तो फोटो पाहुन नेटकरी हळहळले

गडकोट मोहिम प्रचारासाठी भिडे गुरुजींच्या बैठकांचा धडाका