मावळ्यांच्या वेशातील वेटर - शिवप्रेमींच्यात प्रचंड चीड
सध्या एक नवीन फॅशन आलेली आहे.
अनेक हॉटेलमध्ये एक ऐतिहासिक वातावरण बनवण्यात येते,हॉटेल च्या भिंती वगैरे बुरजांसारख्या बनवलेल्या असतात,हॉटेल मध्ये शिवरायांची मुर्ती असते,हे वातावरण पाहुन कुणाचेही मन सुखावेल.
परंतु ज्यावेळेस आपण जेवायला बसतो तेव्हा एक धक्कादायक चित्र पहावयास मिळते ते म्हणजे जेवण वाढणारे वेटर चक्क मावळ्यांच्या वेशात असतात.
शिवरायांच्या काळात स्वतःच्या रक्ताची बाजी लावणाऱ्या मावळ्यांना अशा वेटरच्या रुपात दाखवुन हॉटेल मालक काय सुचवु इच्छितात.
हे दृश्य पाहुन कुणाचीही तळपायाची आग मस्तकात जाईल.
हे प्रकार थांबले नाहीत तर मात्र हॉटेल मालकांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील एवढं मात्र नक्की.
Comments
Post a Comment