२०१९ ची खासदारकी NCP मधुन की BJP मधुन उदयनराजे समर्थकांची उत्सुकता शिगेला

श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व व सतत चर्चेत असणारे नाव म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले.

२०१४ ला मोदी लाटेत सुध्दा साताऱ्यातून उदयनराजे भोसले अतिप्रचंड मतांनी विजयी झाले खरे परंतु मागील ४ वर्षात त्यांचे राष्ट्रवादी मधल्या नेत्यांशी पटत नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व आमदार उदयनराजेंच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत.असे असले तरी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सोबत उदयनराजेंनी चांगले संबंध टिकवून ठेवलेत.

मध्यंतरी उदयनराजेंचा पत्ता कट करुन श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादी तिकीट देणार असल्याच्या वावड्या उठलेल्या यावर उदयनराजेंनी सावध पवित्रा घेतला,वाढदिवस सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या सह भाजपचे प्रमुख मंत्री उपस्थित होते ही त्याचीच साक्ष.

उदयनराजेंनी वेळोवेळी पक्षविरोधी भुमिका घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार व कार्यकर्ते राजेंवर नाराज आहेत.
राजेंनी २०१६ ला नगरपालिका व त्यानंतर झालेली ZP ची निवडणुक राष्ट्रवादी विरुद्ध लढवली नगरपालिकेत तर त्यांनी सत्ता स्थापन केली.

एकीकडे भाजपचे मंत्री उदयनराजेंच्या वाढदिवस सोहळ्याला हजर असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचा एकही आमदार या सोहळ्याला उपस्थित राहिला नाही ही बाब सर्व काही सांगुन जाते.

ऐनवेळी राष्ट्रवादीने तिकीट कापले तरी राजेंकडे भाजपचा पर्याय शिल्लक आहे.
भाजपचे नेते देखील उदयनराजेंच्या भाजप प्रवेशासाठी गुढग्याला बाशिंग बांधुन असल्याचे चित्र आहे.

उदयनराजेंचे सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांसोबतचे चांगले संबंध लक्षात घेता कोणत्याही पक्षातुन त्यांनी निवडणुक लढवली तरी २०१९ ला साताऱ्याचे खासदार तेच असणार आहेत एवढं मात्र नक्की.

Comments

  1. Ek Aavaj Ek Neta UdayanMaharaj Uadaynmaharaj 👑🚩

    ReplyDelete
  2. जय हो 🚩🚩🚩
    एकच राजे

    ReplyDelete
  3. Maharajach hotil Punha Khasdaar

    ReplyDelete
  4. Rajeni pudhacha Veles sene sobat yyave

    ReplyDelete
  5. Rajeni pudhacha Veles sene sobat yyave

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवदान

संभाजी भिडेंचा तो फोटो पाहुन नेटकरी हळहळले

गडकोट मोहिम प्रचारासाठी भिडे गुरुजींच्या बैठकांचा धडाका