संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्याने केलेल्या हल्ल्यात मराठा युवक जखमी
अकोला प्रतिनिधी
सिंदखेडराजा येथील मराठा युवक सचिन पाटील याच्यावर प्राणघातक हल्ला झाला.
दरम्यान हा हल्ला संभाजी ब्रिगेडच्या पंकज जायले ने केला असल्याची पोस्ट सचिन पाटील याने फेसबुक वर टाकली आहे.
सचिन पाटील हा युवक अकोला येथील व्याख्यान संपवुन माघारी जात असताना बाळापूर रोडवर पंकज जायले व साथीदारांनी सचिनला एकट्याला गाठून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला.
तसेच गुन्हेगारांनी सचिनच्या हातातील सोन्याची अंगठी,चेन व मोबाईल पळवल्याची माहिती सचिनच्या मित्रांनी दिली.
सचिन पाटील फेसबुक व youtube च्या माध्यमातून संभाजी ब्रिगेड,बामसेफ यांसारख्या संघटना कसा चुकीचा इतिहास पसरवतात यावरती प्रबोधन करायचा,याचाच राग मनात ठेऊन हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे.
Comments
Post a Comment