प्रत्येक सभांमधुन भिडे गुरुजी तरुणांना देतायत व्यसनमुक्तीची शपथ.
सध्या महाराष्ट्रात अत्यंत चर्चेत असलेले नाव कुणाचे असेल तर ते शिवप्रतिष्ठानचे संस्थापक श्री संभाजी भिडे यांचे.
मागील आठवड्यात त्यांनी केलेल्या आंब्याचे वक्तव्य चांगलेच गाजले.अर्थात शहानिशा केली असता संभाजी भिडे गुरुजी यांना नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न मिडीयाचा होता हे उघड झाले.
भिडे गुरुजींच्या सभांचा धडाका सध्या महाराष्ट्रभर सुरु आहे, दररोज कोणत्या ना कोणत्या शहरात श्री भिडे यांच्या सभा होत आहेत. किल्ले रायगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासन स्थापित करण्याचा संकल्प शिवप्रतिष्ठान ने केलाय त्याच्याच प्रचारार्थ भिडेंच्या सभा सुरु आहेत.
विशेष बाब म्हणजे सभा संपल्यावर भिडे गुरुजी उपस्थित हजारो तरुणांना व्यसनमुक्तीची शपथ देत आहेत.
गुरुजींच्या ह्या उपक्रमामुळे भावी पिढी पुर्णतः निर्व्यसनी बनेल अशी अपेक्षा समाजातुन व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment