शिवप्रतिष्ठानचा पालखी दर्शन सोहळा:उदयनराजेंच्या उपस्थितीची शक्यता
- पुणे प्रतिनिधी
दिनांक ७ जुलै रोजी ज्ञानोबा माऊली व तुकोबांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन होत असुन त्यांच्या दर्शनासाठी शिवप्रतिष्ठान संघटनेचे हजारो धारकरी पुण्यात दाखल होणार आहेत.
गेल्या पाच वर्षांपासून शिवप्रतिष्ठान चे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी हा उपक्रम सुरु केला असुन,त्यास भक्तीगंगा-शक्तीगंगा संगम असे नाव देण्यात आले आहे.
शिवकाळात शिवछत्रपती व संभाजी महाराज पालख्यांच्या दर्शनाला येत असत याच पार्श्वभूमीवर आम्ही प्रतिवर्षी पालखी दर्शनाला येत असतो असे शिवप्रतिष्ठान कडुन सांगण्यात येतेय.
दरम्यान या कार्यक्रमासाठी साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सर्व धारकऱ्यांच्या वाहनांचे टोल न घेण्याचे आदेश दिले असुन ते स्वतः देखिल या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं समजतय.
Comments
Post a Comment