२०१९ ला पुन्हा शिवसेना-भाजप सरकार येणार ?
२०१९ ला पुन्हा एकदा शिवसेना भाजपचे सरकार महाराष्ट्रात स्थापन होईल असा कौल नेटिझन्स नी दिलाय.
सध्या एक नवीन ट्रेंड आलाय,कोणत्याही गोष्टीवर मते जाणून घेण्यासाठी पोल तयार केला जातो व त्याची लिंक व्हाट्सअप्प ग्रुपवर टाकुन वोटिंग करण्याचे आवाहन करण्यात येते.
असाच एक पोल सोशल मीडियावर तयार करण्यात आलेला व २०१९ साली शिवसेना भाजपचे सरकार येईल की काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार येईल याबाबत वोटिंग घेण्यात आल.
त्या पोल वर तब्बल १० हजार च्या आसपास नेटिझन्स नी वोटिंग केले त्यापैकी ५,७०० लोकांना युती सरकार येईल अस वाटत तर ४,३०० लोकांना आघाडी सरकार येईल असं वाटतंय.
अर्थात हा पोल सोशल मीडियावर होता प्रत्यक्षात २०१९ ला काय होते ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Comments
Post a Comment