बापट साहेबांनी साताऱ्यातून लढाव मी माघार घेतो;राजेंची फटकेबाजी

साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे आपल्या हटके अंदाजासाठी देशभर प्रसिद्ध आहेत.
आज साताऱ्यात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या उद्धाटन प्रसंगी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापटांच्या पुढे आपल्या नेहमीच्या स्टाईल मध्ये त्यांनी तुफान फटकेबाजी केली.

त्याप्रसंगी उदयनराजे म्हणाले कॉलेजमध्ये असल्यापासून बापट साहेबांना पाहत आलोय,आता त्यांनी महाराष्ट्राचे राजकारण बास करावे व दिल्लीत यावे म्हणजे आम्हाला त्यांचा सहवास जास्त लाभेल तसेच त्यांची इच्छा असेल तर त्यांनी साताऱ्यातून उभे रहावे,माझी माघार असेल.त्यावेळी उपस्थित नागरिकांमध्ये एकच हशा पिकला.

पुढे बापट आपल्या भाषणात म्हणाले,आज मला अनेक ठिकाणी कार्यक्रमासाठी निमंत्रण होते पण साताऱ्यात राजे उपस्थित राहणार आहेत हे समजल्यावर सगळे कार्यक्रम रद्द करून मी साताऱ्याला आलो,उदयनराजेंसोबत व्यासपीठावर बसणे हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी नेहमीच भाग्याची गोष्ट आहे असही ते म्हणाले.

त्यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, हिंदू एकता आंदोलन व भाजप सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवदान

संभाजी भिडेंचा तो फोटो पाहुन नेटकरी हळहळले

गडकोट मोहिम प्रचारासाठी भिडे गुरुजींच्या बैठकांचा धडाका