भिडे गुरुजींच्या उपस्थितीत उद्या इचलकरंजीत धारकऱ्यांचा शपथविधी
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी उद्या दिनांक ३ सप्टेंबर रोजी इचलकरंजी मध्ये येणार असुन यावेळी ते कोणतीही सभा किंवा बैठक घेण्यासाठी येत नसुन त्यांच्या धारकऱ्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी ते येत आहेत.
गेल्या वर्षी ४ जुन रोजी शिवप्रतिष्ठानच्यावतिने किल्ले रायगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासन पुनरसंस्थापित करण्याचा संकल्प करण्यात आला होता,त्याच सिंहासनाच्या पाहऱ्यासाठी प्रत्येक तालुक्यातुन किमान २००० धारकऱ्यांची तुकडी दररोज रायगडावर जाणार आहे.
महाराष्ट्रातून पहिली २००० धारकऱ्यांची तुकडी इचलकरंजी येथुन तयार झाली असुन उद्या दिनांक ३ रोजी भिडे गुरुजींच्या उपस्थितीत २००० कार्यकर्ते सिंहासनाच्या संरक्षणाची शपथ घेणार आहेत.
सायंकाळी ६ वाजता श्रीशिवतीर्थ इचलकरंजी येथे हा भव्य दिव्य सोहळा पार पडणार असुन,भिडे गुरुजींसह शिवप्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई देखिल ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते मंगेश मस्कर यांनी दिली.
Comments
Post a Comment