डोक्यावरती टोपी हवीच:भिडे गुरुजींची पोलिसांना सुचना
प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही घटस्थापनेच्या मुहूर्तावर श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने श्री दुर्गामाता दौड सुरु झाली असुन राज्यभरात ह्या दुर्गामाता दौडीला तुफान प्रतिसाद मिळत आहे.
शिवप्रतिष्ठानची कर्मभुमी असलेल्या सांगलीत देखिल आज दुर्गामाता दौड उत्साहात पार पडली या दौडीत हजारो सांगलीकरांनी सहभाग घेतला.यंदा दुर्गामाता दौडीचे हे ३५ वे वर्ष आहे.
दौडीमध्ये बंदोबस्तात असलेले पोलिस बिना टोपीचे आहेत हे संभाजी भिडे गुरुजी यांच्या निदर्शनास आले व त्यांनी पोलिसांना टोपी घालूनच येण्याच्या सुचना दिल्या.
श्री भिडे पोलिसांना म्हणाले तुम्ही शासनाचे नोकर असलात तरी सर्वप्रथम भारतमातेचे सुपुत्र आहात,तुमच्या डोक्यावर वारकरी टोपी अथवा पोलिस गणवेशातील टोपी असलीच पाहिजे.
Comments
Post a Comment