यावर्षीची मोहीम प्रतापगड ते रसाळगड:भिडे गुरुजींची घोषणा

सांगली प्रतिनिधी:

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने नवरात्रात नऊ दिवस दररोज पहाटे सुरु असलेल्या दुर्गामाता दौडीचा समारोप आज सांगलीत झाला.त्यावेळी शिवप्रतिष्ठान चे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी प्रतिवर्षी प्रमाणे दसऱ्याच्या दिवशी यावर्षीच्या मोहिमेची घोषणा केली.

किल्ले श्री प्रतापगड ते किल्ले श्री रसाळगड असा यावर्षीच्या मोहिमेचा मार्ग असुन ही मोहिम साधारणपणे जानेवारी महिन्यात होणार असुन मोहिमेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

सांगलीतील शिवाजी महाराजांच्या मुर्ती पुढे जमलेल्या हजारो धारकऱ्यांसमोर भिडे गुरुजींनी यंदाच्या मोहिमेची घोषणा केली व धारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले.

त्यावेळी दसऱ्याचे सोने आधी  शिवछत्रपतींच्या पायाशी ठेवा मग आई वडिलांना द्या असही श्री भिडे म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवदान

संभाजी भिडेंचा तो फोटो पाहुन नेटकरी हळहळले

गडकोट मोहिम प्रचारासाठी भिडे गुरुजींच्या बैठकांचा धडाका