संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवदान

वैचारिक मतभेद कितीही असले तरी मनभेद असणार नाहीत याची प्रचिती नुकतीच माढा तालुक्यात आली.
माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजयमामा शिंदे यांचा भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी पराभव केला.

हाच पराभव जिव्हारी लागल्याने,माढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता पांडुरंग शिंदे (वय २५) याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान शहरातील साई हॉस्पिटलजवळ पांडुरंग शिंदे हा युवक अत्यावस्थ अवस्थेत आढळुन आल्याचे पाहताच संभाजी भिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचा कार्यकर्ता शशिकांत खेडकर याने तात्काळ पांडुरंग ला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

प्रथमोपचारानंतर संबंधित युवकास पुढील उपचारासाठी बार्शी येथे नेण्यात आले असुन त्याची प्रकृती आता ठीक आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस व संभाजी भिडे यांच्यात काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी मनभेद नाहीत हे दाखवत शशिकांत खेडकर पाटील ह्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल तालुक्यातुन त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Comments

  1. राष्ट्रात निर्माण करू अवघा शिवासुर्याजाल

    ReplyDelete
  2. तिच तर शिकवण होय गुरूजींची

    ReplyDelete
  3. सगळेच पक्ष आपले आहेत सगळेच जात आपली आहे दील्लीवर भगवा उभा करायचा आहे

    ReplyDelete
  4. दिल्ली वर भगवा फडकवायचा आहे आपल्याला

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संभाजी भिडेंचा तो फोटो पाहुन नेटकरी हळहळले

गडकोट मोहिम प्रचारासाठी भिडे गुरुजींच्या बैठकांचा धडाका