संभाजी भिडेंचा लांबलचक ताफा जालन्यात आला अन साऱ्यांच्या भुवया उंचावल्या
परवा दिनांक ६ जानेवारी रोजी शिवप्रतिष्ठान चे संस्थापक संभाजी भिडे (गुरुजी) यांची जालन्यात सभा झाली.
काही संघटनांनी सभेला विरोध केला तरीही भिडे यांची सभा झालीच.
दरम्यान एक व्हिडिओ कालपासुन सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
ज्यात संभाजी भिडे हे जालना येथील सभास्थळी जाताना दिसत आहेत.
या व्हिडीओ मध्ये संभाजी भिडे यांच्या गाडीच्या पुढे व मागे 15-20 पोलीस गाड्या व कार्यकर्त्यांच्या गाड्या दिसत आहेत.
भिडे गुरुजींची जालन्यात रॉयल एन्ट्री ह्या आशयाचा व्हिडीओ सर्वत्र फिरत आहे.
वास्तविक पाहता संभाजी भिडे यांचा अशा प्रकारच्या पोलीस संरक्षणाला व बडेजावाला विरोध आहे हे विशेष.
मागे एकदा सांगलीचे SP सुहेल शर्मा यांनी त्यांना पोलीस संरक्षण देऊ केलेले,मात्र अशा प्रकारच्या संरक्षणाची मला गरज नाही ते रद्द करा यासाठी भिडे गुरुजींनी स्वतः एसपिंची भेट घेतलेली.
Comments
Post a Comment