Posts

संभाजी भिडेंचा तो फोटो पाहुन नेटकरी हळहळले

Image
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांचा एक फोटो सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तो फोटो पाहुन अनेक नेटकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आम्हा तरुणांना लाजवेल इतका अफाट त्याग गुरुजींचा असल्याचे अनेकांनी म्हणले आहे दरम्यान Sambhajirao Bhide Guruji या पेजवरुन हा फोटो प्रसिद्ध करण्यात आलेला असुन त्या फोटोला हजारोंच्या संख्येने शिवभक्तांनी पसंती दिली आहे. शिवप्रतिष्ठान आयोजित किल्ले मधुमकरंद गड ते रसाळगड मोहिम दिनांक 12 रोजी संपन्न झाली त्यानंतर आता संभाजी भिडे यांच्या समर्थकांकडुन हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे.

संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवदान

Image
वैचारिक मतभेद कितीही असले तरी मनभेद असणार नाहीत याची प्रचिती नुकतीच माढा तालुक्यात आली. माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजयमामा शिंदे यांचा भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी पराभव केला. हाच पराभव जिव्हारी लागल्याने,माढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता पांडुरंग शिंदे (वय २५) याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शहरातील साई हॉस्पिटलजवळ पांडुरंग शिंदे हा युवक अत्यावस्थ अवस्थेत आढळुन आल्याचे पाहताच संभाजी भिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचा कार्यकर्ता शशिकांत खेडकर याने तात्काळ पांडुरंग ला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रथमोपचारानंतर संबंधित युवकास पुढील उपचारासाठी बार्शी येथे नेण्यात आले असुन त्याची प्रकृती आता ठीक आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस व संभाजी भिडे यांच्यात काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी मनभेद नाहीत हे दाखवत शशिकांत खेडकर पाटील ह्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल तालुक्यातुन त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

संभाजी भिडेंचा लांबलचक ताफा जालन्यात आला अन साऱ्यांच्या भुवया उंचावल्या

Image
परवा दिनांक ६ जानेवारी रोजी शिवप्रतिष्ठान चे संस्थापक संभाजी भिडे (गुरुजी) यांची जालन्यात सभा झाली. काही संघटनांनी सभेला विरोध केला तरीही भिडे यांची सभा झालीच. दरम्यान ...

आधी मुंबई आता जालना;संभाजी भिडेंचा महाराष्ट्रातील झंझावात सुरुच.

Image
संभाजी भिडे यांची सभा आणि सभेला होणारा विरोध हे आता जणु एक समीकरणच बनले आहे. दोन आठवड्यांपुर्वी मुंबईत सुद्धा त्यांच्या सभेला विरोध झालेला व आज जालन्यात देखिल त्यांच्...
https://youtu.be/oCHrSjm02l4

मला मरायच्या आधी अमोल कोल्हे सरांना भेटायचं आहे

Image
इन्स्टाग्रामवर एका तरुणाने एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ज्यात त्याने आपल्याला मरायच्या आधी अमोल कोल्हे सरांना भेटायचं आहे अशी भावनिक इच्छा व्यक्त केली आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा https://youtu.be/ vDVvyouJyZE ( लिंक ओपन होत नसेल तर लिंक वरती दाबुन धरा व युट्युब ह्या पर्यायावर क्लिक करा )

गडकोट मोहिम प्रचारासाठी भिडे गुरुजींच्या बैठकांचा धडाका

Image
शिवप्रतिष्ठान ची यंदाची गडकोट मोहीम किल्ले राजगड ते किल्ले रायगड अशी होणार असुन कालच संघटनेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे याची माहिती दिली. गडकोट मोहिमेचा मार्ग काल निश्चित झालेला असला तरी शिवप्रतिष्ठान चे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी दसऱ्यापासुनच मोहिमेचा प्रचार सुरु केलेला आहे. दररोज 2 ते 3 गावात ते बैठका घेत असुन तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने गडकोट मोहिमेत सहभागी व्हावे असे आव्हान त्यांनी केलेल आहे. सांगली मिरज आष्टा ई.पुर शिराळा कराड सातारा वाई कवठेमहांकाळ इचलकरंजी यासह अनेक गावात गडकोट मोहिमेचा प्रचार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडुन मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.